विक्रोळी उड्डाण पूल १४ जून पासून वाहतुकीस खुला
मुंबई/मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन केले आहे. तसेच, पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कोणत्याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी पूल नागरिकांसाठी खुला करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत….
