अधवान, कथितचे नॉनस्टॉप जेतेपद
निधिष, गिरिषा, एडन, आर्यन, विराज, रुद्र अव्वल मुंबई दि. ९ (क्री.प्र.) – शाळेची सुट्टी संपण्यापूर्वी शालेय बुद्धिबळपटूंसाठी विसडम चेस अॅकॅडमीने आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ७ वर्षाखालील गटात अधवान ओसवाल आणि ८ वर्षाखालील गटात कथित शेलारने नॉनस्टॉप सहा विजय नोंदवत अव्वल सहा गुणांसह बाजी मारली. तसेच विविध सहा गटात…
