अडचणींवर मात करत बँकेची वाटचाल प्रगतिशील ठेवणार’: शालिनी सहकारी बँकेच्या ४५ व्या वार्षिक सभेत अध्यक्ष भानुदास जाधव यांचा विश्वास
मुंबई – शालिनी सहकारी बँक लिमिटेड, मुंबईची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर २०२६ रोजी भायखळा येथील सावळाराम मेहर हॉलमध्ये उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेची सुरुवात बँकेच्या संचालिका सौ वर्षा माळी यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर महाराष्ट्र गीताने सुरुवात करण्यात आली. अलीकडेच निधन झालेल्या स्वर्गीय आमदार शालिनीताई पाटील यांना यावेळी उपस्थित सभासदांनी…
