राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी संपन्न- मराठीतून घेतली शपथ
झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. शनिवारी (दि. १८) राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपालांना पदाची शपथ दिली. राज्यपालांनी मराठीतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार…
