अधिकारांचा मर्यादा भंग नीलम गोऱ्हे आणि सुधाकरराव नाईक
सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या वेळी राडा झाला. शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पोलिसांनी हिसका दाखवल्याचा आरोप झाला. त्या प्रकरणात विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिठासीन अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांची खरमरीत शब्दांत जाणीव करून दिली…
