संपूर्ण देशातील मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण होणार – निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली/गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदानात झालेल्या कथित मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील घोषणा सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेमधून करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार,…
