शिंदे गटाचा जल्लोष तर ठाकरे गटाची तोडफोड
मुंबई-राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्र- अपात्रतेवर निकाल देताना शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करण्यास नकार दिला तसेच खरी शिवसेना शिंदेंचीच आहे असे जाहीर करताच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फटाके लावून तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले . वर्ध्यात एसटी बसेसवर दगडफेक केली…
