मुंबईस्थीत एसव्हीपी ग्लोबलची ओमानमधील प्रकल्पात 150 दशलक्ष यु एस डॉलरची गुंतवणूक
मुंबई, ता. 18 (प्रतिनिधी): भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना, देशातील सर्वात मोठी व मुंबईस्थीत कॉम्पॅक्ट कॉटन यार्न उत्पादक एसव्हीपी ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेडने ओमानमधील त्याच्या मोठ्या कापड निर्मिती प्रकल्पात प्रत्यक्ष व्यावसायिक कामकाज सुरू करण्याची घोषणा केली आहे. या समूहाने ओमानच्या ‘सोहर फ्री ट्रेड झोन’ येथील प्रकल्पात १.५. लाख स्पिंडल आणि ३,५०० रोटर्स सुविधा उभारण्यासाठी…
