मुंबई, दि. (प्रतिनिधी) ज्येष्ठ आणि ऋषितुल्य पत्रकार, अध्यात्माचे उपासक श्री. मधुकर श्रीधर उपासनी यांचे आज सायंकाळी डोंबिवली येथील त्यांच्या निवासस्थानी कर्करोगाच्या आजाराने दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुन नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर रेडिएशन, केमोथेरपी उपचार सुरू होते. परंतु उपचारांना तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांना चिरंजीव मनीष यांनी घरी आणले. आज सायंकाळी साडेपाच च्या सुमारास त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी पत्रकारितेत झोकून दिले होते. शासकीय सेवेत असतांना पत्रकारितेशी त्यांचा संबंध होता तो नंतर पूर्णवेळ पत्रकारितेत परिवर्तित झाला. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी चांगले काम केले. अध्यात्माची त्यांना प्रचंड आवड होती. वसंतराव त्रिवेदी, जगदीश दामले, दामुभाई ठक्कर, विजय वैद्य, विनायक बेटावदकर, कृ. वि. तथा नाना पेठे, भय्यासाहेब सहस्रबुद्धे, राजाराम माने यांच्या सह अनेकांबरोबर त्यांनी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे उत्तम कार्य केले. वसंतराव त्रिवेदी यांच्या सह त्यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अनेक अधिवेशनांना हजेरी लावून अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले. गेल्या काही वर्षापासून गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन, दैनंदिन पंचांग यांचा त्यांनी अनेकांना पुरवठा करुन सर्वांना प्रतीक्षा करायला लावली होती. त्यांच्या निधनाने पत्रकारितेतील ऋषीतुल्य मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले.
Similar Posts
धक्कादायक! कारोना लसी ऐवजी दिली रेबीज ची लस; डॉकटर व नर्स निलंबित
ठाणे/ पालिकेच्या लसीकरण मोहिमेत किती निष्काळजीपणा दाखवला जातो याचे एक भयंकर उदाहरण समोर आले आहे ठाणे महापालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या इसमाला कोविल्डशिल्ड किंवा को व्ह्यकसिन ऐवजी चक्क रेबीज ची लस देण्यात आली या घटनेमुळे लसीकरण केंद्रावर मोठी खळबळ माजली घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असल्याने ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी…
ठाणे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईमशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंचा अल्टिमेटम
ठाणे/ मशिदींवरील भोंगे जर 3 तारखेपर्यंत उतरवले नाहीत तर देशातील सगळ्या मशिदिंसमोर भोंगे लाऊन हनुमान चालीसा पठण करा असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत तर काही झाले तरी भोंगे काढणार नाही कोण आमचे काय करतो तेच बघायचे आहे असे प्रति आव्हान मौलवींनी दिले आहे .राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत शरद पवार आणि राष्ट्रवादीवर तुफान…
धक्कादायक!परप्रांतीय फेरीवालयाचा महिला पालिका अधिकारावर हल्ला; तीन बोटे छाटली
ठाणे/ परप्रांतीय फेरीवालयाकडून चिरीमिरी घेऊन त्यांना अभय देणे किती भारी पडू शकते याचा प्रत्यय काल ठाणे महापालिका प्रशासनाला आलाय.कारण काल एका फेरीवालयाने सहाय्यक पालिका आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर कोयत्याने हल्ला करून त्यांची तीन बोटे छाटली या घटनेने केवळ ठानेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून त्या फेरीवालयाचा अटक करण्यात आलीठाण्याच्या माजिवडा परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर…
ठाणे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात
मुंबई/ घर फिरले की घराचे वासेही फिरतात अशी एक म्हण आहे आणि ती खरी आहे.कारण शिंदेंच्या बंडात सेनेचे 50 आमदार सामील झाले आणि शिवसेना फुटली सरकार कोसळले .शिवसेना फोडणारे शिंदे मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता सगळेच शिंदेंच्या मागे जात असून त्यांची सुरुवात शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून झाली ठाण्यातील सर्व शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असून…
महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची माहिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही ठामपाचा-सार्वजनिक गणेशोत्सव दीड दिवसांचा ठाणे (25) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सव हा समाजहित लक्षात घेवून तसेच शासन व महापालिकेच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करुन यंदाही दीड दिवसांचा साजरा करण्यात येणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन यांनी आज झालेल्या बैठकी दरम्यान नमूद केले.
मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन-
मुंबई, दि. 12 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. मराठी भाषा विभागातर्फे “मराठी भाषा भवन मुख्य केंद्र” प्रस्तावित आहे. इमारतीच्या बांधकामासाठी स्पर्धा घेऊन वास्तूविशारदाची निवड करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेअंतर्गत वास्तूविशारदांनी आज…
