राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची गोळ्या घालून हत्या
जयपूर : राजस्थान जयपूरमध्ये श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुन्हेगारांनी सुखदेव सिंह यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकावरही गोळ्या झाडल्या. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सुखदेव सिंह गोगामेडी यांना मृत घोषित केलं. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. श्याम नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत….
