कंगाल पाकिस्तान
गेल्या काही महिन्यांमध्ये शेजारच्या पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या चिंताजनक आहेत. केवळ भारत द्वेष किंवा हिंदूंचा द्वेष या एकाच भयगंडातून निर्माण झालेल्या या शेजारी राष्ट्राला लष्करासह अनेक घटकांनी वर्षानुवर्षे पोखरून काढले असून तो आर्थिक दिवाळखोरीच्या बरोबरच अभूतपूर्व फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अखंड भारतातून निर्माण झालेल्या या शेजाऱ्याची सर्व स्तरांवरील अवस्था अत्यंत दयनीय असून तीच त्यांचा “भस्मासुर” ठरण्याची…
