महापालिका निवडणुकीवर फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे विचारमंथन
मुंबई -देशातील सर्वात महत्त्वाची असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील भाजपचे सर्व आमदार व खासदारांना आज बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. विधानसभा, विधानपरिषद आमदार आणि लोकसभा व राज्यसभा…
