लाल किल्ल्यावरील 1 कोटींचा कलश चोरणाऱ्या अटक
नवी दिल्ली /ऐतिहासिक लाल किल्ल्यासमोरील पार्कमध्ये जैन समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमातून चोरी झालेल्या ₹१ कोटींच्या कलशाचं रहस्य उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीचं नाव ब्रजभूषण असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला उत्तर प्रदेशातील हापूर येथून पकडण्यात आलं आहे. ब्रजभूषण दिल्लीत ड्रायव्हर म्हणून काम करतो. चोरीच्या वेळी त्याने धोती-कुर्ता…
