मीरा रोडमध्ये उत्तर प्रदेश पेटर्ण – दंगल भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची पालिकेकडून घरे जमीनदोस्त
भायंदर – उत्तर प्रदेशात योगी सरकारने ज्या प्रमाणे गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांची घरे जमीनदोस्त केली त्याच धर्तीवर मीरा रोडमध्ये राम भक्तांच्या मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या समाज कंटकांच्या घरावर आज मीरा भायंदर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून त्यांची घरे जमीनदोस्त केली. मीरा रोड येथील नया नगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर मंगळवारी पालिकेने कारवाई सुरू केली आहे….
