[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भाजपने सनी देवल चे तिकीट कापले- भाजपच्या आठव्या यादीत माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला उमेदवारी


चंदीगड/पंजाब मध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे .त्याचबरोबर पंजाब मधूनच शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे पंजाब मध्ये भाजपाला फारशी आशा नाही. आज पंजाब मधील जे उमेदवार जाहीर केले त्यावरून तसेच दिसत आहे. भाजपने आज अकरा उमेदवारची आठवी यादी जाहीर केली. या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपचे विद्यमान खासदार अभिनेता सनी देवल यांचे गुरुदासपूर मधून तिकीट कापण्यात आले असून, त्यांच्या जागी दिनेश सिंग बब्बु यांना तिकीट देण्यात आले आहे. तर पटियाला मधून पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरेंद्र सिंग यांच्या पत्नी प्रणित कौर याला तिकीट देण्यात आली आहे .लुधियानामध्ये रवणीत सिंग बिट्टू ,जालिंदर मधून सुशील कुमार रिंकू, जाजपुर मधून रवींद्र बोहरा, कंदमल मधून सुकांत कुमार पाणीगृही, कटक मधून भात्रिहारी मेताब, झारग्राम मधून प्रणत तुडू, तर पश्चिम बंगालमधील बहुचर्चित बिर भूमी मधून देवाशी धार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सनी देवल यांची तिकीट कापल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय .परंतु सनी देवल यांनी स्वतःच निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे त्यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार देण्यात आल्याचे भाजपा कडून सांगण्यात आले

error: Content is protected !!