मुंबई – राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गट सतत सामील झाला त्यानंतर आज प्रथमच अजितपवर गटाचे सर्व नेते शरद पवारांच्या भेटीला गेले होते त्यात ९ मंत्र्यांचाही समावेश होता . या भेटीत अजित पवार गटाने राष्ट्रवादी एकसंघ ठेवण्याची पवारांना विनंती केली पण पवारांनी नकार दिल्याचे समजते पवारांच्या भेटीनंतर फुटीर गटाच्या नेत्यांनी सांगितले कि आज आमचे दैवत शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे यांच्यासह हे सर्व नेते वाय बी चव्हाण सेंटरला वेळ न मागता संधी साधून आलो. आम्ही शरद पवारांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले आणि त्यांना विनंती देखील केली. आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच, तसेच राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहू शकतो, याबद्दल त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावे, असी विनंती देखील केली. यावर शरद पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
Similar Posts
अर्थकारणाचे काँक्रीट पूर्ण न झाल्याने आपल्याच बालेकिल्ल्यात १४ रस्त्यांच्या कामात स्थायी समितीचा स्पीड ब्रेकर
मुंबई/ पैशापुढे नीतिमत्ता,निष्ठा आणि कधी कधी पक्षाचाही काही लोक विचार करीत नाहीत म्हणूनच तर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने जी दक्षिण आणि एफ दक्षिण विभागातील १४ रस्त्यांचे २७ कोटींचे प्रस्ताव अडवून ठेवले आहेत.भाजपने हे प्रकरण उघडकीस आणताना शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.विशेष म्हणजे ज्या भागातील रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव अडवलेत त्यात लालबाग, परळ,काळाचौकी, लोअर परळ यासारखे शिवसेनेचे बालेकिल्ले…
कुपवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार व्हावे : राज्यपाल रमेश बैस छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र ब्रेल लिपीत आणणार : मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. २० ऑक्टोबर २०२३: छत्रपती शिवाजी महाराजांचा जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे स्थापित करण्यात येणारा पुतळा आपल्या सैनिक, अधिकारी आणि नागरिकांना सतत प्रेरणा देईल. याचप्रमाणे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या…
मणिपूर चकमकीत १० कुकी बंडखोर ठार
इंफाळ – मणिपूरातील जिरीबाम जिल्ह्यात कुकी बंडखोरांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बोरोबेक्कार सब डीव्हीजन जिरीबामच्या जकुराधोर करोंगमध्ये सुरक्षा दलाने दहा कुकी बंडखोरांचा खातमा केला आहे. या ऑपरेशनमध्ये सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. मणिपूरच्या इंफाळ खोऱ्यात जातीय संघर्ष उफाळलेला आहे. येथे मूलतत्ववाद्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. हे कुकी बंडखोर शेतात काम करणाऱ्यांवर…
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई/गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत जागा वाटपाचा जोक होळ सुरू होता तो अजूनही पूर्णपणे मिटलेल्या नाही महाविकास आघाडी 270 जागांवर एकमत झाल्याचे सांगण्यात येते परंतु प्रत्यक्षात अजूनही पंधरा ते वीस जाग्यांवर मध्ये आहे या मतभेदातच शिवसेनेने ६५ 65 उमेदवार यांची पहिली यादी जाहीर केली होती त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 45 उमेदवारांची आपली पहिली यादी…
तुम्हाला जनतेने तडीपार केले आहे – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
ठाणे – विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीचा ठाण्यात आज विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दांत निशाणा साधला. “चंद्राबाबू नायडूंनी तुमचा पाठिंबा मागितला का? बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना. सरकार पडणार, मुख्यमंत्री…
भिवंडी -वसई रोडवरील मालोडी टोलनाका वसुली मनसे कार्यकर्त्यानी केला बंद
भिवंडी दि 19 तालुक्यातील अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाची खड्डयांमुळे दुरावस्था झाली असून या विरोधात स्थानिक नागरीकांच्या सर्वपक्षीय गाव विकास समितीच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा टोल वसुली बंद करा या साठी आंदोलन केली जात असताना स्थानिकांच्या रास्तारोको आंदोलना च्या एक दिवस आधी या रस्त्याची पाहणी मनसे ठाणे…
