[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेमुंबई

भिवंडीत खदाणीतील पण्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू

भिवंडी:-सध्या अवकाळी पावसाने दगड खदाणीत पाणी साचले आहे.याच साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडी परिसरात घडली आहे .सत्यम पन्नीलाल चौरसिया ९ वर्षे व शुभम जितेंद्र चौरसिया वय १४ वर्षे अशी या मुलांची नावे आहेत. दोघे रा.यादव बिल्डिंग बालाजी नगर नारपोली येथील आहेत
मिळालेल्या माहितीनुसार सत्यम व शुभम हे दोघे आपल्या इतर मित्रांसह मंगळवारी दुपारी कालवार गावाच्या हद्दीतील दगड खदान मध्ये अवकाळी पावसाने साचलेल्या डबक्यात पोहण्यासाठी गेले होते.त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडले.सायंकाळी चार वाजले तरी मुले घरी न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला परंतु ती मुले न सापडल्याने मुलांच्या हरविल्याची तक्रार भोईवाडा पोलिसांकडे नोंदविली होती.बुधवारी सकाळी खदान येथील डबक्यात मुलांचे मृतदेह आढळून आल्याने त्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून शव विच्छेदना साठी शासकीय रुग्णालयात घेऊन गेले.या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे .

error: Content is protected !!