मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक मतदार संघात माविआचे उमेदवार विजयी झाले तर कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले .नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपच्या छुप्या पाठींब्याने सत्यजित तांबे विजयी झाले तर अमरावती पदवीधर मतदार संघात माविआचे धीरज लिंगाडे विजयी झाले भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपमेदवार ना गो गाणार यांचा दारुण पराभव झाला त्यांना केवळ ८२११ तर विजयी उमेदवार माविआचे सुधाकर आडबोले याना १६७०० मते मिळाली सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपने छुपा पाठींबा दिलेले अपक्ष सत्यजित तांबे यांचा ४६ हजाराहून अधिक मतांनी विजय झाला तर त्यांच्या प्रतिस्पर्धी माविआच्या शुभांगी पाटील यांना २४२४९२७ मते मिळाली औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी २००९२ मते घेऊन विजय मिळवला तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे किरण पाटील याना १३४९७ मते मिळाली अमरावती मतदार संघात चुरशीची लढत झाली माविआच्या लिंगाडे याना ४३३८३ तर रंजीत पाटील याना ४१ ००५ मते मिळाली
Similar Posts
महाराष्ट्र | मुंबई | विश्लेषणपानिपतच्या पराभवाचा बदला
लाख मराठा सैन्य धारातीर्थी पडलेल्या पानिपतच्या युद्धातील पराभव मराठ्यांच्या जिव्हारी लागला होता. माधवराव पेशव्यांनी बदला घेण्यासाठी महादजी शिंदे,तुकोजी होळकर, विसाजीपंत बिनीवाले,रामचंद्र कानडे यांच्या फौजा दिल्लीवर हल्ला करण्यासाठी रवाना केल्या.मराठ्यांच्या फौजा त्वेषाने दिल्लीत शिरल्या.मराठ्यांनी दिसेल त्या अफगाण सैन्याला कापायला सुरुवात केली.मराठा फौजांनी लाल किल्याला वेढा दिला.आक्रमक मराठ्यांच्या पुढे अफगाण सैनिकांनी शरणागती पत्करली.मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून…
मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लाटण्यासाठी कायद्यात बदल करण्यास सुरुवात-आशिष शेलार
मुंबई- “विद्यापीठाच्या निविदांमधील निधी वळवण्याचे काम याआधी ठाकरे सरकारने केले आहे. आता यापुढे एक पाऊल टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लक्ष करण्याचे काम ठाकरे सरकारचे आहे. भूखंड लाटण्यासाठी कायद्यात बदल करण्यास सुरुवात झाली आहे. असे आरोप शेलार यांनी केले. विद्यापीठांच्या निधीवरूनही ठाकरे सरकारवर टीका केली. पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी…
महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला! मुंबईत शिंदेसेना ९० तर भाजपा १३७ जागा लढवणार
मुंबई /मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अखेर भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवेसना यांचं जागावाटप ठरलं आहे. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप १३७ जागा लढेल. तर, एकनाथ शिंदेंची शिवेसना ९० जागांवर निवडणूक लढणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस बाकी असताना भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप निश्चित झालं आहे. , शिवसेना, आरपीआयची महायुतीची चर्चा…
युट्युबवरील अश्लील जाहिरातीमुळे परीक्षांत नापास झाल्याचा दावा करून ७५ लाख मागणाऱ्याला २५ हजारांचा दंड
मुंबई – युट्युब वरील अश्लील जाहिराती मुळे लक्ष विचलित होऊन पोलीस भरती परीक्षेत मी नापास झालो . त्यामुळे मला ७५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारी एक याचिका मुंबई उंचच न्यायालयात दाखल करण्यात आली होती . पण न्यायालयाने ती फेटाळली असून याचिकाकर्त्यालाच २५ हजारांचा दंड ठोठावला आहे मध्य प्रदेशमधील पन्ना येथे राहणाऱ्या आनंद…
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान मधील पुष्पोत्सवात यंदा जागर राष्ट्राभिमानाचा
मुंबई महापालिकेतर्फे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात म्हणजेच पूर्वीच्या राणीच्या बागेत येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत पुष्पोत्सव भरविण्यात येणार आहे. दरवर्षी हा उत्सव एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो. यंदाच्या पुष्पोत्सवात भारतातील राष्ट्रीय प्रतिके पानाफुलांच्या मदतीने साकारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मनोरंजनासह ज्ञानातही भर घालता येणार आहे. याशिवाय…
सावरकरांच्या नावाला आयोजकांचा विरोध- साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात
नाशिक/ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे पुढील महिन्यात होत असून संमेलन स्थळाला सावरकरांचे नाव देण्यास आयोजकांनी विरोध केल्यामुळे सावरकर प्रेमी संतप्त झाले असून त्यांनी नाशिक मध्ये ठिकठिकाणी निषेधाचे फलक लावले आहेत शिवाय त्यांच्या या तीव्र विरोधामुळे साहित्य संमेलनाच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले…
