मुंबई – हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिशा शर्मानं काल आत्महत्या केली. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तुनिषाच्या मृत्यूचं कारण गळफास हेच असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. तिच्या आईचं म्हणन होतं की, शीझानचं आणि तुनिषाचा ब्रेक अप झालं होतं. त्यामुळं ती नैराश्यात गेली होती. शवविच्छेदन अहवालात गरोदर असल्याबाबत पुष्टी करण्यात आलेली नाही. तसंच लव्ह जिहादचाही काही अँगल नसल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. तिच्या हातावर जे बॅन्डेज लावले होते. शीझान खानला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असल्याच एसीपी जाधव यांनी म्हटलं आहे.
Similar Posts
ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला नेहमी दूर ठेवले त्याच काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदासाठी युती केली – राज ठाकरे
मुंबई- दुसऱ्याला गद्दार भरणारे उद्धव ठाकरे हेच मोठे गद्दार आहेत त्यांच्यामुळेच नारायण राणे मी स्वतः आणि शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले असा थेट आरोप मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केला आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बाळा नांदगावकर यांच्यासाठी राज ठाकरे यांनी शिवडी मतदार संघात प्रचार सभा घेतली होती या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला…
नव्या अधिसूचनेनुसार मुंबईतील एस सी, एस टी चे १७ प्रभाग राखीव होणार – ठाकरे गटाला सर्वाधिक फटका
मुंबई/ येत्या मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीसाठी अधिक कठीण बनली आहे.मात्र महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आता आरक्षणाच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष आहे.मात्र राज्य सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे दोन मिळून १७ प्रभाग राखीव होणार असून त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या दोन्ही ग्रान बसणार आहे.मुंबई महानगरपालिका प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप…
अजित पवार गटाला शरद पवारांचा फोटो लावण्यास मनाई
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये सामील झाले आहे. आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाच्या कार्यालयात उद्घाटन पार पडले. यावेळी कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी तर दार तोडून प्रवेश केला आहे.मात्र अजित पवार गटाला आपला फोटो लावण्यास शरद पवारांनी मनाई केली…
अंधेरी के -पूर्व विभागाचे विभाजन होणार
मुंबई -नागरिक सुविधा पुरवण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन अंधेरी के पूर्व विभागाचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे . के दक्षिण व के उत्तर असे नवीन विभाग तयार करणार होणार आहेत यातील एका प्रभागात सात तर दुसर्या प्रभागात आठ प्रभाग समाविष्ट करण्यात येणार आहेत. यामुळे प्रत्येककाला नागरिक सेवा पूर्ण शक्य होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे….
पावसाळी जाळ्या सफाईच्या कामात कंत्राटदार व पालिका अधिकार्यांचे आर्थिक साटेलोटे ?- मनुष्यबळ पुरवतात खाजगी संस्था पण त्या कामाचा मलिदा मात्र कंत्राटदारांला
मुंबई-(किसन जाधव) पालिकेच्या कंत्राटदारांकडून आतापर्यंत नालेसफाईच्या कामातच पालिकेला चुना लावला जायचा पण आता शहरातील रस्त्यावरची पावसाळी जाळ्या साफ करण्याच्या कामात सुधा पालिकेला चुना लावला जातोय. कंत्राटदार नुसता बोली बच्चन करून, कामात लागणारी मजूर त्याच्याकडे नसल्यामुळे प्रभागातील कार्यरत संस्था कडील मजूर लावून काम करून घेत असल्याची माहिती पुढे आली आहे .पर्जन्य जलवाहिनी प्रभागातील अभियंते या कंत्राटावर…
उद्यापासून सरकारी कर्मचारी संपावर
मुंबई – जुन्या पेन्शनचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे.आणि या मुद्द्यावर सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने मंगळवारपासून सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहेआंदोलक कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यात आज बैठक झाली. पण या बैठक निष्फळ ठरली. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतरही कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. उद्यापासून राज्यभरातील सरकारी आणि निम सरकारी…
