[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कोषारी राज्यपालपद सोडण्याची अफवा

मुंबई/ शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं आहे . त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते .त्यानंतर कोषारी राजीनामा देणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या .मात्र राजभवन मधून ही शक्यता फेटाळण्यात आली राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे .त्यामुळे राज्यपालांच्या राजीनाम्याची अफवाच होती हे स्पष्ट झाले आहे तर दुसरीकडे संभाजीराजे आणि उदयन राजे यांनी एक बैठक घेऊन राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत चर्चा केली . आता 3 डिसेंबरला रायगडावर या बाबत निर्णय घेतला जाणार आहे तर महाविकास आघाडी राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक देणार आहे .

error: Content is protected !!