मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहायांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे त्यासाठी त्यांनी शिंदे भाजप मिळून मिशन 150 चे टार्गेट भाजप कार्यकर्त्यांना दिले . 227 पैकी 150जागा जिकणे भाजपने मुंबईकरांसाठी असे काय केले आहे ते मात्र सांगितले नाही . त्यांनी मुंबईकरांना गृहीत धरले आहेत पण मुंबईकर अंधभक्त नाही त्यामुळे तो कुणाच्याही मागे फरफटत जाणार नाही . त्यामुळे 150 जागा जिंकण्याचा कल्पना विलास हास्यास्पद आहे .अमित शहा यांनी मुंबईकरांना अजून पुरते ओळखलेले नाही .त्यांना हे ठाऊक नसेल की मुंबईकरांचा भाजप वर किती राग आहे . ज. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाने लढून मुंबई मिळवली आहे त्यासाठी 105 आंदोलकांनी प्राणाचे बलिदान केलेय . पण मुंबईला केंद्राकडून कधीच न्याय मिळाला नाही देशातील एकूण महसुलाच्या 40 टक्के महसूल एकट्या मुंबईतून देशाला मिळतोय त्या बदल्यात मुंबईला काय मिळतेय .आज मुंबईतील अनेक विकास योजना पैशा अभावी पडून आहेत पण त्याकडे केंद्राचे लक्ष नाही उलट मुंबईला आर्थिक राजधानीचा जो बहुमान प्राप्त आहे तो भाजपच्या डोळ्यात खुपतोय .त्यामुळे आर्थिक राजधानी मुंबई ऐवजी अहमदाबादला करण्याचा घाट घातला जातोय .त्यासाठी मुंबईतील काही महत्वाच्या संस्था अहमदाबादला शिफ्ट करण्याचा खटाटोप सुरू आहे . मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी मोदी आणि अमितशहांचे गुजराती मारवाडी टपून बसले आहेत . त्यांना मुंबईतून मराठी माणसाला घालवायचे आहे म्हणून त्यांना मुंबई महापालिका हवी आहे .पण या मुंबईत इथला मुंबईकर मराठी माणूस त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही शिवसेनेतल्या दोन चार फितुरांना हाताशी धरून मुंबई जिंकण्याचे स्वप्न जर कुणी पाहत असेल तर त्यांचे ते स्वप्न कदापि सत्यात उतरणार नाही .
Similar Posts
सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला – किशोरी पेडणेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार
मुंबई -: करोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अटक टाळण्यासाठी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. या निर्णयाला पेडणेकर उच्च न्यायालयात आव्हान देणार असून तोपर्यंत त्यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे. करोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला…
उभारू नव संकल्पाची गुढी
आज गुढी पाडवा ! साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ! गुढी पाढव्याने हिंदू नव वर्ष रभ होतो.त्यामुळे घरावर गुढ्या तोरणे उभारून नववर्षाचे स्वागत करण्याची पद्धत आहे. नव वर्षाचा आज प्रारंभ असल्याने आजच्या दिवशी नवे संकल्प करायचे असतात आणि पुढे वर्षभर ते संकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न करायचे असतात.या वर्षीच्या गुढी पाडव्याच्या वैशिष्ट म्हणजे हा गुढीपाडवा निर्बंध मुक्त…
मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहचले आहेत. राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहकुटुंब पोहचले आहेत. या भेटीदरम्यान मागील काही दिवसात झालेल्या घडामोडींच्या संदर्भात देखील आजच्या भेटीत चर्चा होण्याची…
सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वेळी तोडफोड
सोलापूर/शनिवारी सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाच्या वेळी काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली यात एक किसान किरकोळ जखमी झाला तर याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर त्या मोर्चात स्फोटक वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरुद्धही कारवाई केली जाणार असल्याचे समजतेसध्या देशभर आणि खास करून महाराष्ट्रात हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार विधाने केली जात आहेत…
पालिकेची प्रतिबंधित प्लास्टिक विरोधी कारवाई सुरू एफ – नॉर्थ प्रभागात तीनशे किलोचा साठा जप्त
मुंबई/प्लास्टिक मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरांना बंदी घातली होती तरीसुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या इतर वस्तू विकल्या जातात .त्यामुळे या बेकायदा प्लास्टिक विक्रीला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन विभागाने प्लास्टिक विरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. पालिका एफ नॉर्थ प्रभागाच्या अनुज्ञापन विभागाने माटुंगा येथे…
फराळाच्या सरकारी कीटला भ्रष्टाचाराच्या मुंग्या- गरिबांची दिवाळी रामभरोसे
मुंबई/ दिवाळी अवघ्या एका आठवड्यावर आलीय श्रीमंतांच्या घरात दिवाळीचा फराळ बनून तयार झालंय पण सरकारने गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी 100 रुपयात ज्या चार वस्तूंचे पॅकेट देण्याची घोषणा केली होती .त्यात भ्रष्टाचार झाल्यामुळे सरकारची ही दिवाळी भेट अजूनही गोरगरीब जनतेपर्यंत पोचलेली नाही परिणामी गरिबांची दिवाळी रामभरोसे आहे .राज्यात सत्तांतर होऊन शिंदे गट आणि भाजप युती चे…
