मुंबई/ इमारत मालकांच्या भरोषावर राहून रहिवाश्यांच्या जीव धोक्यात घालण्याचे दिवस आता संपले आहेत कारण नव्या सरकारने मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे .त्यानुसार इमारतीचा जो मालक असेल त्याने ठराविक काळात जर ती इमारत दुरुस्त केली नाही तर त्या इमारीचा पुनर्विकास तिथले रहिवाशी करू शकतात आणि या कामी त्यांना सरकार सर्वतोपरी मदत करणार आहेत त्यामुळे 40/५० वर्षांच्या जुन्या भाडेकरूंना इमारतीचा मालक यापुढे घबरवू शकणार नाही कारण बाप दाखव नायतर श्राद्ध कर या म्हणी नुसार जर मालक इमारतीचा पुनर्विकास करायला तयार नसेल तर त्याला बाजूला सारून तिथले रहिवाशी आता इमारतीचा विकास करू शकतात. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक चाळ मालकांचे धाबे दणाणले आहेत .
Similar Posts
मुंबईसह १० महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर
मुंबई/ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ट असल्याने तसेच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी सरकार आणि सर्वच राजकीय पक्षांची भूमिका असल्यामुळे मुंबईसह १० महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे तसेच या महापालिकांमध्ये आता प्रशासक नेमला जाणार असल्याचे समजतेमुंबई सह १८ महापालिकांच्या निवडणुका होणे बाकी आहे या महापालिकांचा कार्यकाल मार्च ते एप्रिल दरम्यान संप्तोय…
पतीने केलेल्या भ्रष्ट कमाईला पत्नीचा पाठिंबा – गुन्हा दाखल
सिल्लोड- शासकीय पगाराव्यतिरिक्त पतीने नियमबाह्य कामे करून जर संपत्ती कमविली असेल तर त्याची चौकशी झाल्यानंतर पत्नी जर दोषी आढळली तर तिच्यावरही गुन्हा दाखल करण्याची व्यवस्था कायद्यामध्ये आहे .असाच एक गुन्हा सिल्लोड येथे वर्ग 2 चे सहाय्यक दुय्यम निबंधक छगन उत्तमराव पाटील यांची पत्नी वंदना छगन पाटील यांच्या विरोधात दाखल झाला आहे.छगन उत्तमराव पाटील यांना दिनांक…
कयित ऑडिओ क्लिप प्रकरणी रामदास कदम यांच्यावर कारवाई होणार?
मुंबई/ अनिल परब यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनीच कागदपत्र पुरवली असा आरोप आहे याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्यामुळे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्ध ठाकरे चांगलेच संतप्त झाले असून ते रामदास कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते मात्र रामदास कदम यांनी आपल्यावरच…
पालिकेचे दवाखाने भूमाफियांच्या रडारवर -पवईतील प्रयत्न हाणून पाडला
मुंबई -सध्या मुंबईत भूमाफियांचा सुळसुळाट झाला असून मोकळे आणि आरक्षित भूखंड हडपण्याची जणू स्पर्धा लागली आहे. आणि आता तर पालिकेचे दवाखाने हडपण्याचे प्रयत्न सुरु झाले असून पवईच्या तुंग गाव येथील एक दवाखाना हडपण्याचा भूमाफियांनी प्रयत्न केला पण पालिका अधिकाऱ्यांनी तो हाणून पाडला . दवाखान्याची जागा भूमाफिया जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत.असाच एक प्रयत्न पवई येथील…
नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या कैद्यांची भारतात घुसखोरी५ कैद्यांना अटक
काठमांडू/नेपाळमधील तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने देशातील परिस्थिती गंभीर झाली. याचदरम्यान, नेपाळच्या १८ जिल्ह्यांतील तुरुंगातून सुमारे ६ हजार कैदी पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यातील पाच कैद्यांनी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला, पण सशस्त्र सीमा दलाने त्यांना सिद्धार्थनगर परिसरात अटक केली.नेपाळ मधील तुरुंगातून पळून गेलेल्या पाच कैद्यांना सशस्त्र सीमा दलाने अटक केली आहे….
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी सुरू – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
मुंबई, : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजातील आर्थिक गैरप्रकारांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून विविध पातळ्यांवर चौकशी सुरू आहे. कारखाना भाडे तत्वावर देताना केलेल्या त्रिपक्षीय करारातील अटींचा भंग झाला असल्यास साखर आयुक्तांकडे लवाद प्रक्रियेअंतर्गत (आर्बिट्रेशन) प्रकरण चालविण्याची कार्यवाहीही करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली….
