मुंबई/ न्यायालयाच्या आदेशानंतरही एस टी कामगारांनी संप सुरूच ठेवल्याने राज्य परिवहन महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे . मात्र त्यावरील सूनवणींबई उच्च न्यायालयाने सोमवार पर्यंत पुढे ढकलली आहे .दरम्यान काल राज्याच्या वेग वेगळ्या भागातून असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले .त्यांना मंत्रालयावर मोर्चा काढायचा होता पण पोलिसांनी परवानगी नाकारली . यावेळी मोर्चात सामील झालेल्या भाजप नेत्यांनी आणि एस टी कामगारांनी सरकार विरुद्ध घोषणा देत जोवर विलीनीकरण होत नाही तोवर परतणार नाही अशा घोषणा दिल्या . दरम्यान सायंकाळी कृती समिती व परिवहन मंत्री यांच्यात बैठक झाली पण त्यातून तोडगा निघाला नाही त्यामुळे संप सुरूच राहणार आहे .
Similar Posts
कर्जतमधील नांदगाव व ओलमण येथिल शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!!!! आमदारांचा उपस्थितीत निवासस्थानी झाला प्रवेश!
कर्जत तालुक्यांतील ओलमन आणि नांदगाव ग्रामपंचायती मधील शेकाप आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज सेनेचे आमदार महेद्रशेठ थोरवे यांचा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी या सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे व अन्य पदाधिकारी व प्रवेशकर्ते दिसत आहेत.
आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन
मुंबई/ भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारचे पाहिले पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात इतर प्रश्नानं बरोबरच सत्ताधारी पक्षाच्या आमदार कडून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि मंत्र्यांकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेली मारहाण हे मुद्दे गाजणार आहेत कारण अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विरोधी पक्ष नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ता आली म्हणून मस्ती आली का असा सवाल अजित दादांनी…
आज मानापमान नाट्यात चिपीचे लोकार्पण; पद मोठे पण पत्रिकेवर नाव छोटे राणे नाराज
ठाकरे राणे एकाच व्यासपीठावरसावंतवाडी- आज कोकणातील बहुचर्चित चिपी लोकार्पण होत असून त्या निमित्ताने एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत त्यामुळे दोघांच्याही समर्थकांमध्ये काही राडेबाजी होऊ नये म्हणून विमानतळ परिसरात प्रंचड फौजफाटा तैनात करण्यात आला आहेकोकणातील चिपी येथे २७४ हेक्टर जागेवर हा विमानतळ बांधण्यात आला…
सणासुदीच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू नका, अन्न व औषध प्रशासन विभागाचा व्यावसायिकांना इशारा- नागरिकांना अशाप्रकारे कुठेही भेसळ आढळल्यास तक्रार करा .
गणेशोत्सव काळात मिठाईला देखील मोठी मागणी होत असते. मात्र अनेक व्यावसायिक हीच संधी साधत मिठाई पदार्थांमध्ये भेसळ करत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग आता सतर्क झाला.मुंबई : गणेशोत्सव आणि आगामी सणोत्सवाच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू नका तसेच नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचेल असे कृत्य केल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा असा इशारा…
आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान दिनदर्शिका अनावरन संपन्न-
मुंबई- आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान दिनदर्शिका अनावरन नुकतेच करण्यात आले त्याप्रसंगी विश्वस्त सर्वश्री महेश पवार, समाजसेवक एकनाथ तांबवेकर, एडवोकेेट राजाराम शिंदे,श्रीधर फडतरे,शिवाजीराव जाधव व जिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख हजर होते. संघटनेचे अध्यक्ष श्री राजाराम निकम व उपाध्यक्ष श्री बाबुराव माने यांनी याप्रसंगी सर्व सातारकराना नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी मुंबादेवीच्या दर्शनाला तर उप मुख्यमंत्री सिद्दी विनायकाच्या चरणी
उघडले मंदिराचे दारनेत्यांची च गर्दी फारमुंबई- करोनाच्या संकटांमुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली मंदिरे काल पासून उघडण्यात आली मात्र पहिल्याच दिवशी देवदर्शन घेण्यासाठी राजकारण्यांनी गर्दी केली होती मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यानी सकाळी सहकुटुंब मुंबादेवी चे दर्शन घेतले तर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन पूजा केली यावेळी बहुतेक मंदिरात मंत्री संत्री,आमदार खासदार आणि त्यांच्या…
