मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अडकलेले माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल १२तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते परमवीर सिंग यांनी देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केले होते त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय आणि ई डी ने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला . तसेच त्यांच्या स्विय सहाय्यक आणि आणि अन्य एका सहकाऱ्याला अटक केली तसेच देशमुख यांच्या घरावर आणि कार्यालयावर तीन वेळा छापे टाकले दरम्यान इडी ने देशमुखांच्या पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीला हजार झाले नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लुक आऊट नोटीस बजावण्यात आली आपल्यावरील गुन्हे रद्द करावेत म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण ती फेटाळण्यात आली शेवटी कोणताही पर्याय न उरल्याने ते काल दुपारी इडी च्या कार्यालयात १२वाजता हजार झाले तेंव्हापासून रात्री १२वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते .
Similar Posts
अनधिकृत इमारत वाचवण्यासाठी ७५ लाखांची लाच घेताना पालिकेचा लाचखोर अभियंता मंदार तारीला अटक
मुंबई -मुंबई सारख्या महानगरात अनधिकृत बांधकामे कोणामुळे होतात आणि ती वाचवणारे भूमाफियांचे पालिकेतील दलाल अधिकारी कोण हे अनेक वेळा उघडकीस आले आहे. पण या चोरांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते इतके माजलेत कि आता अनधिकृत इमारती वाचवण्याच्या सुपार्या घेत आहेत. अशाच एका लाचखोर अभियंताला ७५ लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या २ साथीदारांसह…
त्यांच्या तोंडून कधी शिवाजी महाराजांचे नाव नाही निघाले- राज ठाकरेंचा शरद पवारांवर जोरदार हल्ला बोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेतून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. तसंच शरद पवारांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या नाराजीनाट्यावरही राज ठाकरे यांनी खास त्यांच्याच शैलीमध्ये टोलेबाजी केली. अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना कोणाच्यातरी डोक्यात खूळ आलं, अरबी…
सुरक्षित रक्षाबंधनासाठी मारुती कुरिअरची ऑनलाईन बुकींग व वितरण सेवा
मुंबई, ता. ९ (प्रतिनिधी): या वर्षी रक्षाबंधनाचा सण आणखी खास बनवण्यासाठी श्री मारुती कुरिअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, भारतातील अग्रगण्य कुरिअर आणि लॉजिस्टिक्स कंपनीने अनोखी ऑनलाइन आणि ऑफलाइन राखी बुकिंग आणि वितरण सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. देशभरात कोविड -१९ चा धोका लक्षात घेता, सुरक्षित अंतर राखणे ही काळाची गरज आहे, हे पाहता कंपनीने राखी…
लाडक्या बहिणीमुळे कुटुंबाला मो ठा आर्थिक आधार लाभार्थी म्हणतात : गरीबांसाठी दिड हजार महिना आर्थिक सक्षमीकरणाचा पाया
धाराशिव ( परंडा ) : राज्य शासनाचा महिला सशक्ती करणावर भर असून महिलांना सशक्त, आत्मनिर्भर होण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत मिळालेल्या रक्कमेमुळे गरीब परिस्थिती असलेल्या महिलांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाल्याची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या…
शेतकऱ्यांकडून ५० पैसे दराने घेतलेल्या केल्याची मॉलमध्ये ८६ रुपयांना विक्री
हैदराबाद/आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी शेतकऱ्यांची व्यस्था मांडणारी एक पोस्ट केली आहे. शेतकऱ्यांना केळी ५० पैसे किलोने विकावी लागत आहेत. तर सध्या दिल्लीत अॅमेझॉन फ्रेश फ्रुट्समध्ये केळी ८६ रुपये किलो दराने विकली जात आहे, अशा आशयाची ही पोस्ट आहे. मध्य प्रदेशातील शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत असल्याची बातमी तुम्ही नुकतीच वाचली असेल. याचे कारण…
सणांपेक्षा जीव महत्वाचा-मुख्यमंत्री
मुंबई/ सध्या करोनाचा संकट काळ सुरू आहे अशावेळी गर्दी करून कोरॉनाचा प्रादुर्भाव वाढवू नका सण काय नंतरही साजरे करता येतील पण सणापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी जनतेला आवाहन केले आहे त्याच बरोबर राजकीय पक्षांनी सुधा या संकट काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम हाती घेऊन गर्दी करू नये असेही म्हटले आहे मुख्यमंत्र्यांच्या…
