भिवंडी दि 11- भिवंडीची यंत्रमाग उद्योग आणि गोदामांची नगरी म्हणून ओळख असून मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार सह बहुसंख्य शहरातून दररोज हजारो कामगार, व्यापारी भिवंडीत येत असतात मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन लागू करून दिड वर्षांपासून ट्रेन बंद असून कोरोनाचा धोका कमी झाल्याने बहुसंख्य ठिकाणी ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत मात्र भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या पनवेल – डहाणू, दिवा – वसई ट्रेन बंद असल्याने भिवंडीत येणारे कामगार, व्यापारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने आज रेल्वे प्रवाशांनी ट्रेन सुरु करण्यासाठी आक्रोश करीत मागणी केली आहे.पनवेल – डहाणू, दिवा – वसई या ट्रेन दिवसातून पाच वेळा धावत असतात त्यामुळे भिवंडीत येणाऱ्या हजारो कामगार, व्यापाऱ्यांना काहीही त्रास नव्हता मात्र गेल्या दिड वर्षांपासून कोरोना मुळे ट्रेन बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून ट्रेनमधून येण्यासाठी 20 रुपये मोजावे लागत असताना आता खाजगी वाहनाने तीनशे पेक्षा जास्त रुपये मोजावे लागत आहे त्यात वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत असल्याने शासनाने भिवंडी रोड रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या ट्रेन सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रवाशी यांनी केली आहे..
Similar Posts
मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला नीतेश राणे वर अटकेची टांगती तलवार
मुंबई/ सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणात संतोष परब या शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता मात्र काल उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने नितेश राणे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार असून…
जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार; विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक रत्न पुरस्कारांचे वितरणनाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून त्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी जिल्ह्याला राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आज महाकवी कालीदास कलामंदिर येथे नाशिक रत्न पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअच्छे दिन विरुद्ध सच्चे दीन
२०२४ ची निवडणूक मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल-ममता बॅनर्जी दिल्ली-मोदी सरकारच्या विरुद्ध आता देशातील सगळे विरोधक एकवटले असून ५ दिवसांच्या दिल्ली भेटीवर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी काल सोनिया गांधी सह सर्व प्रमुख विरोधी नेत्यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की २०२४ ची लोकसभा निवडणूक ही मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल तसेच…
भारतात लोकसंख्येचा स्फोट चीनलाही मागे टाकले
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारताने चीनला मागे टाकलं असून भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. यूएनएफपीएने जागतिक लोकसंख्या अहवालजाहीर केला आहे. यात भारताची लोकसंख्या १४२८. ६ मिलिअन इतकी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या १४२५. ७ मिलिअन आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या चीनपेक्षा२. ९ मिलिअनने अधिक आहे. गेल्या काही वर्षात चीनची लोकसंख्या झपाट्याने कमी…
परशुराम घाटात दरड कोसळली वाहतूक ठप्प
मुंबई/ मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून चिपळूण / कलंबस्ते लोटे मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून कोकणात पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे परशुराम घाटात रात्री दरड कोसळून सर्व दगड माती रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प…
कोरोना बाबत केंद्राकडून दिलासा
मुंबई/ कोरोनच्या दहशती खाली वावरणाऱ्या जनतेला केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे केंद्राने एक नवी नियमावली जारी केली असून यापुढे देशांतर्गत प्रवासासाठी आर टी पी सी आर चाचणीची गरज नाही तसेच कोरोनची लक्षणने दिसत नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोणा बधिताच्या संपर्कात असलेल्या माणसाला सुधा चाचणी करून घेण्याची आवश्यकता नाही…
