भिवंडी (आकाश गायकवाड ) शहरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. रजाक ( वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष ) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर हसीम शेख ३५, सुबेदा खातून ३५ , अमिना अन्सारी ४५ , रोशन बानो ३०, जारा कलाम १२, रोजी फातिमा १४, जिकरा अन्सारी १४ अशी जखमींचीनावे आहेत. शहरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक परिसरात शब्बीर अंसारी यांचे राहते घर होते. मार्केट परिसरात असलेल्या या घराच्या आजू बाजूला शब्बीर यांनी घराच्या गेलेरिवर वाढीव अधिकृत बांधकाम केले होते. या इमारतीच्या खाली किराणा दुकान तसेच इतर दुकाने होती. मार्केट परिसर व दुकाने असल्याने याठिकाणी नागरिक खरेदीसाठी आले होते. त्यावेळी वाढीव गेलेरी व घराचा भाग खरेदी साठी आलेल्या नागरिकांवर कोसळल्याने या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या दुर्घटनेत घरातील कोणीही जखमी झाले नसून मार्केट व दुकानात खरेदीसाठी आलेला नागरिक या दुर्घटनेत मयत झाला तर महिला, नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये तिघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल , पोलीस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक दाखल होऊन मदत कार्य सुरू होते. भोईवाडा पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे…
Similar Posts
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार
योजनेतील जाचक अटी काढणार शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई दि १२: नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार…
भाजपला मत म्हणजेच विरोधकांना मत ! दीपक केसरकरांकडून महायुतीला घरचा आहेर
सावंतवाडी /नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी भाजपवर टीका केली आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला चार मराठी शब्द बोलता येत नाही, असे म्हणत केसरकर यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रध्दा सावंत भोसले यांना टोला लगावला. सावंतवाडी…
पालिकेतून निलंबित केलेल्या विष्णू घुमरे याला अटक होणार
मुंबई/ पालिकेच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना कोणत्याही वित्तीय संचालक पदावर नियमानुसार राहता येत नाही असे असतानाही पालिका कर्मचारी एकाच वेळी दोनदोन नोकऱ्या करतात त्यांची पालिकेतील नोकरी केवळ हजेरी पाटावर असते वरिष्ठांना लाच देऊन फक्त पालिकेत हजेरी लावून घ्यायची आणि काम दुसरीकडे करून पालिकेला चुना लावायचा असे बरेच प्रकार पालिकेत सुरू आहेत . पण विष्णू घुमरे या पालिका…
बकरी ईदच्या निमित्ताने नितेश राणेंचा मुस्लिमाना इशारा
मुंबई/जे नियम हिंदूंच्या सणाला लावले जातात तेच नियम मुसलमानांच्या सणाला का लावले जात नाहीत असा सवाल करीत राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सोसायटीमध्ये जबरदस्तीने कुर्बानी द्याल तर याद राखा असा इशारा मुसलमानांना दिला आहे . नितेश राणे यांच्या या इशाऱ्यामुळे मुस्लिम समाजात संतापाचे लाट उसळली असून बकरी इच्छा तोंडावरच एका नव्या धार्मिक वादाला तोंड फुटणार…
पालिका अधिकाऱ्याला ४ हजाराची लाच घेताना अटक
मुंबई – जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असे म्हणतात . ते खरेच आहे. पालिका अधिकाऱ्यांना गलेलठ पगार मिळतो तरीही चिरीमिरी घेण्याचा हलकटपणा त्यांच्यातून काही जात नाही. पालिकेच्या टी विभागातील घनकचरा विभागाचे वित्तीय अधिकारी निर्वाना तेलगुटे याला एका कंत्राटदार महिलेकडून ४ हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पालिका अधिकारी कंत्राटदारांकडून लाखो रुपयांची लाच घेतात…
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाची पहिली यादी जाहीर
मुंबई / मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती झालेली आहे. महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार की फक्त भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या दरम्यान मुंबई/अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. समाजवादी पार्टीच्या पहिल्या यादीत…
