[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडकरींच्या लेटर बॉम्ब नंतर मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश


मुंबई/ वाशिम जिल्ह्यात रस्त्यांच्या कामात शिवसेना कार्यकर्त्यांनी अडथळे आणल्यामुळे कामे रखडत आहेत ही बाब केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री समजताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत.दरम्यान या घटनेची काँग्रेसने सुधा गंभीर दखल घेतली असून या मुद्द्यावर गडकरींच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे
रस्त्याच्या कामाची कंत्राटे घेतलेल्या ठेकेदार लोकांकडे सत्ताधारी पक्षाचे काही नेते आणि कार्यकर्ते पैसे मागतात आनि पैसे दिले नाही तर काम अडवण्याचा धमकी देतात त्यामुळे अनेक प्रकल्प रखडतात. वाशिम जिल्ह्यातील तसेच सुरू होते मात्र याबाबतच्या तक्रारी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कानावर आल्या होत्या. त्यामुळे गडकरी भयंकर नाराज झाले होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना पात्र लिहून नाराजी व्यक्त केलीय घटनेमुळे सत्ताधारी शिवसेनेची बदनामी होईल हे लक्षात येताच तात्काळ उद्धव ठाकरे यांनीi चौकशीचे आदेश दिलेत
.

error: Content is protected !!