मुंबई/महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवरुन मुंबईकरांना आवाहन केलं. आदित्य ठाकरेंनी आपल्या आक्रमक शैलीतून भाषण केल्यानंतर राज ठाकरेंनीही विविध मुद्दयावरुन भाजपला लक्ष्य केलं. एमआयएमसोबत युती, पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव, ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं जातंय, बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केलं जातंय, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल, अशा शब्दात राज ठाकरे मुंबईकरांना आवाहन केलं. तसेच, आपल्या भाषणात लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी २०२१४ ते २०२४ या गेल्या १० वर्षात उद्योगपती गौतम अदानींच्या वाढलेल्या संपत्तीचा लेखाजोखाच मांडला.
मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने मुंबईकरांना आज ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा आज शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात पार पडली. सभास्थळी एलईडी स्क्रीन्सही आधीच लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे अपक्षेप्रमाणे राज ठाकरेंनी आपल्या लाव रे तो व्हिडिओ शैलीत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. भाषणाच्या सुरुवातीलच, मी या व्यासपीठावर लहान असताना अनेकदा आलो, सेनेची स्थापना झाल्यानंतर माझे आजोबा माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि माँ उपस्थित होत्या. खरतर आज माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, माँ हे चित्र पाहायला हवे होते, आम्ही जो लढा उभारलाय ते वरतून पाहत असतील, अशी भावनिक साद राज ठाकरेंनी दिली. आज खूप काही घेऊन आलोय… पोट भरून घरी जा… काही जण तिकीट वाटपात नाराज झाले, त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आपलेच आहेत, परत येतील… आत्ताच आहे ते जातील. गेलेले तर परत येतीलच, असे म्हणत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर व्यासपीठावरुन दिलगिरी व्यक्त केली. मी आणि उद्धव एकत्र आलो मुंबईवर आलेला हे संकट… एक डाव या सरकारकडून रचला जातोय. हिंदी सक्ती करत होते, मी कडाडलो आणि उद्धवही कडाडला. हिंदी सक्ती फक्त मराठी माणसाला चाचपडण्यासाठी होती. आली कुठून हिम्मत? कोणाला विचारायचं नाही, जनतेची किंमत काय, पैसे दिले की आम्ही विकत घेऊ, आला कुठून विश्वास. गृहीत धरून टाकलय तुम्हाला… बोगस वोटर आणि इ व्हि एम मशीन सुरु आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी मतदान प्रक्रियेवर हल्लाबोल केला

