रेल्वेचे रोजचे तिकीट बंद
मुंबई/ दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाच्या पासाची परवानगी देणाऱ्या सरकारने आता इतरांची कोंडी करण्यासाठी रेल्वेचे तिकीट च बंद करण्याचा निर्णय घेतला असून ज्यांच्याकडे मासिक पास आहे अशा लोकांनाच रेल्वेतून प्रवास करता येणार आहे रेल्वे प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून हा निर्णय तात्काळ मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा मुंबईकर रेल्वे प्रवाशांनी दिला आहे कारण सरकारच्या या निर्णयामुळे आजारी माणसे,किंवा महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांना रेल्वे प्रवास करता येणार नाही
