पाटणा/बिहारमधील विधानसभा निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. त्यामध्ये, काही विद्यमान आमदारांचेही तिकीट कापलं जात असून नवे चेहरे मैदानात उतरवले जात आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या राजद म्हणजेच राष्ट्रीय जनता दलाने यंदा तिकीट वाटपात अनेक फेरबदल केले आहेत. गत २०२० च्या निवडणुकीत जिंकलेल्या ३६ जागांवरील उमेदवार बदलून नवी रणनीती आखली आहे. त्यामध्ये, माजी मंत्री तेजप्रताप यादव यांच्या मतदारसंघात देखील दुसराच उमेदवार देण्यात आला आहे. तर, ३६ विद्यमान आमदारांचे तिकीटही कापले आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राजदने बिहार विधानसभा निवडणुकासाठी १४३उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गतनिवडणुकीत १४५जागांवर निवडणूक लढवणाऱ्या राजदने यंदा बहुतांश विद्यमान आमदारांचे तिकीट कापलं आहे. तब्बल ३६ विद्यमान आमदारांचे तिकीट पक्षाने कापले, त्यामुळे पक्षात खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येते. दरम्यान, पक्षाने४१ उमेदवारांना पुन्हा संधी दिली असून त्यामध्ये अलोक मेहता, चंद्रशेखर, युसूफ सलाउद्दीन आणि चंद्रहास चौपाल यांच्या नावाचा समावेश आहे.
नाबाद येथील आमदार सुदय यादव यांचे सीट बदलण्यात आले आहेत. सुदय यांना जहानाबादऐवजी कुर्था मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षात सर्वात मोठा फेरबदल करताना पक्षाने तेजप्रताप यादव यांच्या मतदारसंघात माला पुष्पम यांना उमेदवारी दिली आहे. रघुनाथपूर येथील विद्यमान आमदार हरीशंकर यादव यांचं तिकीट कापून बाहुबली नेते शहाबुद्दीनचे पुत्र आरओसामा यांना निवडणुकीत उतरवलं आहे. तर, धोरय्या येथून आमदार भुदेव चौधरी यांचंही तिकीट कापण्यात आलय. दिनारा येथूनही विद्यमान आमदाराचे तिकीट कापण्यात आलंतेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राजदने बिहार विधानसभा निवडणुकासाठी १४३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गतनिवडणुकीत १४४ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या राजदने यंदा बहुतांश विद्यमान आमदारांचे तिकीट कापलं आहे. तब्बल ३६विद्यमान आमदारांचे तिकीट पक्षाने कापले, त्यामुळे पक्षात खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येते. दरम्यान, पक्षाने ४१ उमेदवारांना पुन्हा संधी दिली असून त्यामध्ये अलोक मेहता, चंद्रशेखर, युसूफ सलाउद्दीन आणि चंद्रहास चौपाल यांच्या नावाचा समावेश आहे. जहानाबाद येथील आमदार सुदय यादव यांचे सीट बदलण्यात आले आहेत. सुदय यांना जहानाबादऐवजी कुर्था मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षात सर्वात मोठा फेरबदल करताना पक्षाने तेजप्रताप यादव यांच्या मतदारसंघात माला पुष्पम यांना उमेदवारी दिली आहे. रघुनाथपूर येथील विद्यमान आमदार हरीशंकर यादव यांचं तिकीट कापून बाहुबली नेते शहाबुद्दीनचे पुत्र ओसामा यांना निवडणुकीत उतरवलं आहे. तर, धोरय्या येथून आमदार भुदेव चौधरी यांचंही तिकीट कापण्यात आलय. दिनारा येथूनही विद्यमान आमदाराचे तिकीट कापण्यात आलं असून आरजेडी चे युवक प्रदेशाध्यक्ष राजेश यादव यांना संधी देण्यात आलीय.

