मुंबई/ महाराष्ट्राच्या मराठवाडा ,उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रकोप सुरू असून या पावसाने आतापर्यंत १२ जनाचे बळी घेतले आहेत.तर ७० लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून २२१५ कोटींची मदत जाहीर केली आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानभरपाई जाहीर केली आहे. खरीप २०२५ मधील पिकांच्या नुकसानीसाठी २२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आजच जाहीर केला असून, ही रक्कम आजपासूनच वितरीत केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी सर्वाधिक बाधित झाले होते. सरकारने केलेल्या पंचनाम्यानुसार, एकूण ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलले आहे.
पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. जाहीर झालेली मदत आजच वितरित केली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यास मदत होईल. मराठवाड्यासह राज्यातील ज्या-ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्या सर्व भागांतीलज्या-ज्या भागात आतवृष्टा झाला आह, त्या सव भागाताल शेतकऱ्यांचा या मदतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले होते. त्याकरिता ही मदत असणार आहे.
दरम्यान, जुलै महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ७२१ कोटी, नाशिकमध्ये १३.७७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये पुणे विभागासाठी १४.२९, नागपूर विभागाला २३.८५ कोटी आणि अमरावती विभागाला ५६४.६० कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर कोकणाला १०.५३ कोटी रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही सगळी मिळून राज्य सरकारने खरीप हंगामासाठी आतापर्यंत २२०० कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले होते.
शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी
राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 2 हजार २१५ कोटींची मदत आतापर्यंत रिलीज करण्यात आली आहे. मात्र हे सर्व पैसे एकाच जीआरने नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या जीआरच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच ही प्रक्रिया अद्याप थांबलेली नाही. आत्तापर्यंत २२१५ कोटी रुपयांची मदत आम्ही केली आहे. त्यातले १८२९ कोटी रुपये पोहचले आहेत असे सांगितलं

