ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मराठी विजयी मेळावा हा मराठी भाषेपुरता होता त्याचा राजकारणाशी संबंध नाही/ राज ठाकरे


नाशिक/हिंदीच्या सक्तीविरोधात एकत्र आलेले ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकाही एकत्र येऊन लढतील अशी मराठी माणसाला अपेक्षा होती.परंतु युतीबाबत मनसेने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे.मराठी विजयी मेळावा हा मराठी भाषेपुरताच होता .त्याचा राजकारणाशी संबंध नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी ठाकरेंची शिवसेना व मनसेच्या युतीबाबत आणखी संभ्रम निर्माण केला आहे.
मनसेच्या इगतपुरी येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत.यावेळी प्रसार माध्यमांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारले असता, विजयी मेळावा हा मराठी भाषेपुरताचा मर्यादित होता त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही असे सांगितले .त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे .ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मेळाव्यानंतर आगामी निवडणुकीत ठाकरे आणि मनसेचिव्युती होणार याबाबतच्या राजकीय चर्चा रंगू लागल्या .काही ठिकाणी तर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरही लावले होते .त्यातच मीरारोड येथे झालेल्या आंदोलनात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्यवसंस्थांच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवतील असे चित्र निर्माण झाले होते .मात्र राज ठाकरे यांनी अत्यंत सावध पावले टाकायला सुरुवात केली आहेत. त्यांनी सुरुवातील आपल्या पक्षाच्या सर्व नेत्यांना आणि प्रवक्त्यांना शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीबाबत काहीही बोलू नका असे आदेश दिले होते त्यानंतर आता त्यांनी विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असे म्हणत या बाबत सध्या तरी काहीही बोलण्यास नकार दिला आहे .त्यामुळे ठाकरे बंधू खरोखरच. एकत्र एवं निवडणुका लढवतील की स्वातंत्रपणे लढतील याबाबत निश्चित काही सांगता येत नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत .पण अजून निवडणूक आयोगाकडून घोषणा झालेली नाही.त्यामुळे कोणाबरोबर युती करायची हे अजूनतरी मनसेने ठरवलेले नाही .युतीबाबतचा निर्णय नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात त्यावेळचे चित्र पाहून घेऊ असे राज ठाकरेंनी सांगितल्याचे समजते.

error: Content is protected !!