ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सुधारित वक्त बोर्ड कायद्याचा पहिला दणका बेकायदेशीर भाडे वसूल करणाऱ्या पाच जणांना अटक


अहमदाबाद/वक्फ बोर्ड सुधारित कायद्याचा सर्वात पहिला झटका आमदाबाद मधील पाच जणांना बसला आहे . वक्फ बोर्डाचे ट्रस्टी असल्याचे भासवून वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील घरे आणि दुकानांचे सतरा वर्ष भाडे वसूल करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे
शहरातील गायकवाड हवेली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरनुसार, कांचनी मशीद ट्रस्ट आणि शाह बडा कसम ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरील सुमारे १०० घरे आणि दुकानांचे भाडे हे पाच जण वसूल करत होते.

   अहमदाबाद येथील"वक्फ बोर्डाच्या अंतर्गत नोंदणी असलेल्या ट्रस्टच्या मालमत्तेचा वैयक्तिक लाभासाठी गैरवापर केल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध फसवणूक आय पी एल बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला," अशी माहिती डीसीपी भरत राठोड यांनी दिली आहे.वक्फ मालमत्ता ही धार्मिक किंवा धर्मादाय कार्यासाठी देण्यात आलेली असते. अशा मालमत्तेपासून मिळालेले उत्पन्न हे साधारणपणे धार्मिक कामे किंवा लोकांच्या फायद्यासाठी वापरले जाते आरोपींनी दोन्ही ट्रस्टच्या मालकीच्या ५,००0 मीटरपेक्षा जास्त जागेवर बेकायदेशीर बांधकाम केले. त्यांनी २००८ ते २०२५ दरम्यान सुमारे १०० इमारती (घरे आणि दुकाने) बांधल्या आणि त्यांचे मासिक भाडे वसूल केले," असेही पोलिसांनी सांगितले
error: Content is protected !!