९ टक्के हिंदू जरी एकत्र आले तरी रामराज्य स्थापन होईल / अभिनेते मिथुन चक्रवर्ती
कोलकाता/ पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे तिथे हिंदूंवर अन्याय होतो असे बोलले जाते . त्यावर भाष्य करताना ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी एक महत्वाचे विधान केले आहे मिथुनदा म्हणाले पश्चिम बंगालमध्ये ९ टक्के हिंदू जरी एकत्र आले तरी इथे रामराज्य येईल
चक्रवर्तींनी मागच्या महिन्यात पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा या ठिकाणीही असंच एक वक्तव्य केलं होतं. पश्चिम बंगालच्या राज्यातील लोकांना माझं इतकंच सांगणं आहे की बंगालमध्ये ९ टक्के हिंदू असे आहेत जे मतदान करत नाहीत. त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. त्यांनी बाहेर यावं आणि मतदान करावं. आपण जिंकलो नाही तर हिंदू अडचणीत येतील असं मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटलं होतं. आज तकने हे वृत्त दिलं आहे. उत्तर २४ परगणा या ठिकाणी मिथुन चक्रवर्ती असंही म्हटलं होतं. बांगलादेशात जे घडलं आहे त्यावरुन आपण धडा घेतला पाहिजे. आपण जर जिंकलो नाही तर पश्चिम बंगालमध्ये हिंदू बंगाली वाचणार नाहीत. भाजपा समर्थक हिंदू बंगाली सुरक्षित राहणार नाहीत. जर पुन्हा आहे तेच लोक सत्तेत आले तर ते आपल्याला सोडणार नाहीत असंही मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे.
