इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत सादर देशात कोण आला, कधी आला, किती काळासाठी आला याबाबतच्या माहितीसह इथे येणाऱ्या प्रत्येक विदेशी नागरिकाचा डेटाबेस तपासला जाणार
नवी दिल्ली/केंद्र सरकारने विदेशी नागरिकांवर बारीक नजर ठेवण्यासाठी इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत मांडले विदेशी नागरिकांबाबत आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहेत त्याचाच एक भाग म्हणून विदेशी नागरिकांबाबत नव्याने धोरणे आखली जात आहेत. संसदेत इमिग्रेशन रिफॉर्म बिल मांडण्यात आले त्यावर आता चर्चा सुरू होईल याबाबत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले विदेशातून भारतात येणाऱ्या बांगलादेशी, रोहिंग्या तसेच अन्य विदेशी नागरिकांवर कठोर आणि बारीक नजर ठेवली जाणार आहे .कोण आला कधी आला किती काळासाठी आला आणि भारतात येण्यामागचा त्याचा उद्देश काय होता याबाबत सगळी माहिती आणि डेटाबेस गोळा केला जाणार आहे तसेच ब्रिटिश काळातील तीन जुने कायदे रद्द करून त्या जागी नवे कायदे आणले जाणार असल्याची माहितीही अमित शहा यांनी दिली .गेल्या अनेक दिवसांपासून त्या तीन नव्या कायद्यांवर विधी तज्ञांचा विचार घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत करून हे कायदे बनवण्यात आलेले आहेत या कायद्यामुळे विदेशी घुसखोरीला आळा बसण्याची शक्यता आहे
