[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून १२५ कोटींची लॉटरी

नवी दिल्ली – टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ ध्वनी पराभव करून वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून १२५ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान वर्ल्डकप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा माजी कर्णधार विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी टी २० मधून निवृत्ती जाहीर केली आहे

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा फायनल सामन्यामध्ये सात धावांनी पराभव केलेला. या विजयानंतर जगभरातून टीम इंडियाचं कौतुक केलं जातं आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यावर देशभरात मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. टी-२० क्रिकेटध्ये हे दिग्गज आता दिसणार नाहीत, वर्ल्ड कप जिंकल्यावर प्रत्येक खेळडा भावनिक झालेला होता. एखाद्या लहान मुलासारखे रडताना दिसले, कारण याआधी सेमी फायनल आणि फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यंदा वर्ल्ड कप जिंकल्यावर प्रत्येक खेळाडू ढसाढसा रडल्याचं पाहायला मिळालं.
टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा विक्रम घेतला होता. २० ओव्हरमध्ये १७६-७ धावा केल्या होत्या. यामध्ये टीम इंडियाकडून विराट कोहली याने 76 धावांची जिगरबाज खेळी केली. त्यासोबतच अक्षर पटेल यानेही महत्त्वाची ४७ धावांची खेळी करत सामन्यामध्ये टीम इंडियवरील दबाव केला. टीम इंडियाच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिका संघाला २० ओव्हरमध्ये २६९-८ धावाच करता आल्या. टीम इंडियाने सात धावांनी विजय मिळवला, आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. हार्दिक पंड्या 3 तर बुमराह आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. सामन्यानंतर विराट कोहली याला सामनावीर तर जसप्रीत बुमराहला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं

error: Content is protected !!