कणकवली/ आज माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवलीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या परचरासाठी सभा घेतली .यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली
राज ठाकरे यांनी सांगितले की मला एखादी गोष्ट पटली तर पटली म्हणतो नाय पटली तर नाही म्हणतो मोदींची भूमिका त्यावेळी मला पटली नव्हती म्हणून त्यांची भूमिका पटली नाही असे उघडपणे सांगितले पण त्यांच्या सरकारने कलम 370 रद्द करून दाखवले जगभरात देशाची प्रतिमा उंचावली म्हणून त्यांना बिनशर्त पाठींबा दिला काहीलोक म्हणतात की महाराष्ट्राचे उद्योधांदे गुजरातला नेले पण जे लोक असा आरोप करीत आहेत ते गेल्या 10 वर्ष पैकी साडेसात वर्ष सत्तेत होते मग ते काय करीत होते असा सवाल त्यांनी केला यावेळी त्यांनी नारायण राणे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात केलेल्या कामाचे कौतुक केले

