बोरीवली अतिक्रमण प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर पालिका ॲक्शन मोडवर; मुख्य विधी अधिकारी सक्तीच्या रजेवर
मुंबई: बोरीवली पूर्व येथील ‘बेस्ट’ बस आगाराच्या आरक्षित भूखंडावरील अनधिकृत अतिक्रमणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला (BMC) फटकारल्यानंतर पालिका प्रशासनाने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. न्यायालयाने दाखवलेल्या तीव्र नाराजीनंतर पालिकेच्या मुख्य विधी अधिकारी ॲड. कोमल पंजाबी यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अतिक्रमणांवर वेळेत कारवाई न करणे आणि न्यायालयात अर्धवट माहिती सादर केल्याचा…
