मुंबईत अवैध झोपडपट्ट्यांवर ‘नेत्रम’ प्रणालीची करडी नजर; उपग्रह प्रतिमांद्वारे होणार कारवाई
मुंबईतील सरकारी जमिनीवरील वाढत्या अवैध अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) ‘नेत्रम’ ही आधुनिक डिजिटल प्रणाली सुरू केली आहे. एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केलेल्या या प्रणालीला गुजरातच्या ‘भास्कराचार्य राष्ट्रीय अवकाश अनुप्रयोग आणि भू-माहितीशास्त्र संस्थेने’ (BISAG-N) तांत्रिक साहाय्य दिले आहे. एसआरए मुख्यालयात यासाठी विशेष ‘नेत्रम’ कक्ष स्थापन करण्यात आला…
