मशिदीविरोधी आंदोलनाचे प्रकरण; किरीट सोमैयांसह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात
मुंबई: मुंबई विमानतळाजवळील कथित अनधिकृत मशिदीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर, पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमैया आणि त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी प्रशासनाला इशारा दिला होता. त्यानुसार, सोमैया आज हातात हातोडे घेतलेल्या कार्यकर्त्यांसह विमानतळ परिसरात दाखल झाले होते. मशिदीवरील बेकायदेशीर बांधकामावर तातडीने हातोडा चालवून ती पाडण्यात यावी, अशी त्यांची आक्रमक मागणी होती. मात्र,…
