बुधवारपासून स्वामी समर्थच्या व्यावसायिक कबड्डीचा आवाज – बलाढ्य 12 संघ एकमेकांशी भिडणार
मुंबई, दि. ५ (क्री.प्र.)- एकापेक्षा एक कबड्डीपटू… शेरास सव्वाशेर असे तगडे संघ… कबड्डीचा आवाज वाढवणारा दमदार सोहळा… एकेका गुणासाठी चढाई- पकडींची होणारी ठस्सन… संघांना लक्षाधिश करणारे मान आणि सन्मान… कबड्डीपटू,कबड्डीप्रेमी आणि कबड्डी संघटकांना प्रेमात पाडणारे दिमाखदार आयोजन… सारेच काही एका मॅटवर पाहण्याची रोमहर्षक संधी कबड्डीप्रेमींना लाभणार आहे ती प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत….
