व्याजदरवाढीमुळे मंदीला आमंत्रण नको .!
रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या बुधवारी त्यांच्या पतधोरण बैठकीमध्ये रेपो दर ०.२५ टक्के वाढवण्याचे ठरवले. शेअर बाजारासह सर्वांची हीच अपेक्षा होती. मात्र या व्याजदर वाढीपोटी देशातील उद्योगांवर मंदीचे सावट पडणार नाही याची दक्षताही रिझर्व बँकेने घेतली पाहिजे. त्या दृष्टीकोनातून मध्यवर्ती बँकेच्या निर्णयाचा घेतलेला हा मागोवा. जगभरातील सर्व प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँका गेल्या काही सप्ताहांमध्ये त्यांचे…
