अजितदादा, मला भावलेला परखड आणि मुरब्बी राजकारणी! –
महाभारताच्या काळापासून आपल्या मुलांना पुढे आणण्याची एक प्रथा, परंपरा सुरु झाली आहे जी आजही प्रकर्षाने पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. प्रचलित राजकारणात अशी नांवे घेण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. ती ओघानेच समोर येतांना दिसतात. परंतु अशामुळे कुटुंबातील कार्यक्षम व्यक्तीला फटका बसतो. लाल किल्ल्यावरुन घराणेशाहीबाबत कितीही उच्चरवाने बोलण्यात येत असले तरी ही घराणेशाही…
