बिर्ला परिवाराने उद्योगाला दातृत्व व सामाजिक दायित्वाची जोड दिली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
बिर्ला महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राजभवन येथे पोस्टेज स्टॅम्पचे अनावरण महात्मा गांधींशी घनिष्ठ संबंध असलेल्या बिर्ला परिवाराने उद्योगाला दातृत्व व सामाजिक दायित्वाची जोड दिली. आपल्या शिक्षण संस्थांमधून बिर्ला समूहाने भारतीय संस्कृती व नितीमूल्ये जोपासल्यामुळे समूहाचे नाव आदराने घेतले जाते, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले. कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयाच्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष…
