अदानी समूहाने फॉरेन्सिक ऑडिटला सामोरे जावे!
गेल्या सप्ताहात दि. २६ जानेवारी रोजी आपण ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना अमेरिकेतील एका संशोधन कंपनीने कोट्यावधी रुपये कमावत भारतातील अदानी उद्योग समूहाचे वस्त्रहरण करण्याचा उद्योग केला. यानंतर दोघांनीही एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु ठेवले. यामुळे शेअर बाजारात दाणादाण झाली. या भानगडीचा हा धांडोळा. अमेरिकेतील न्यूयॉर्कस्थित हिंडेनबर्ग रिसर्च ही शेअर बाजारात संशोधन करणारी…
