मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी नाकारणे भोवले मीरा भाईंदरच्या पोलिस आयुक्तांची उचलबांगडी! कौशिक नवे आयुक्त
भाईंदर/मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी नाकारणे, आणि मोर्चासाठी आलेल्या लोकांची धरपकड करणे, मीरा-भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या चांगलेच अंगाशी आले असून त्यांची पोलिस आयुक्त पदावरून उचल बांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता निकेत कौशिक मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तलयाचे नवे पोलीस आयुक्त असतील .मीरारोडमध्ये काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्याला मारहाणीच्या निषेधात मोर्चा काढण्यात आला होता….
