पोलिसांच्या लाठीमारानंतर रिफायनरी विरुद्धचे आंदोलन- ३ दिवसांसाठी स्थगित प्रकरण पुन्हा चिघळणार
राजापूर – रिफायनरीविरोधात बारसूमध्ये सुरू असलेले आंदोलन आज चिघळले. पोलिसांनी रिफायनरीच्या माती सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. त्याशिवाय, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक ग्रामस्थ जखमी झाले. पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हाधिकारी, कोकण परिक्षेक्षत्राचे पोलीस महानिरीक्षक दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, ग्रामस्थांनी याला विरोध करत पाठ फिरवली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह…
