म्हाडाच्या १५ इमारती धोकादायक जाहीर
मुंबई: म्हाडाकडून मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या अशा १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक जाहीर करण्यात आलेल्या सात इमारतींचा समावेश आहे. या अतिधोकदायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४२४ निवासी आणि१२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवासी राहत असल्याची माहिती आहे. रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे आणि कार्यवाहीस सहकार्य करण्याचे इमारत दुरूस्ती मंडळाने…
