आर्थिक दृष्ट्या हलाखीत जीवन जगणाऱ्या पत्रकाराने सरकारी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा आहे काय ?
साधारणतः नव्वदच्या दशकातील या घटना. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मित्रवर्य प्रकाश देशमुख हे अध्यक्ष आणि मी कार्यवाह होतो. मी दैनिक सामना तर्फे राजकीय म्हणजे मंत्रालय आणि विधिमंडळ परिसरात वार्तांकन करीत होतो. प्रकाश देशमुख हे सकाळचे प्रतिनिधी होते तर विजय साखळकर हे धावते नवनगर चे काम पहात असत. विजय नंतर संपादकही झाला. रोज आम्ही…
