बारावीचा निकाल रखडण्याची शक्यता
शिक्षकांचे आंदोलन चिघळल्यास पेपर तपासणीवर बहिष्कार
राज्यात महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. आता, या परीक्षेचे निकाल रखडणार असल्याची भीती शैक्षणिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बारावीच्या परिक्षेतील उत्तरपत्रिका तपासण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तसेच पडून आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन चिघळल्यास त्याचा थेट परिणाम…
